www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या खर्डा इथं घडलेल्या दलित तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आर. आर. पाटलांनी राज्यातल्या प्रत्येक विभागात 6 स्पेशल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केलीय. दरम्यान, रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय.
राज्यात वाढत असलेल्या दलित आणि मागासवर्गीयांवरील हल्ल्यांना आळा घालण्यात यावा तसंच दलित अत्याचाराचे प्रलंबित खटले त्वरित निकाली काढण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय अत्याचार प्रतिबंधक सेल सक्षम करण्याचे आदेश दिले असून चांगली यंत्रणा उभी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.
दरम्यान, नितीन राऊत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत दलितांवरील अत्याचारात वाढ झालेलय पुरोगामी राज्यात दलितांवर अत्याचारांच्या घटना वाढणे हे धक्कादायक आहे. गेल्या तीन वर्षांत दलितांच्या अत्याचारात वाढ झाली आहे. हे दलितांसाठी धक्कादायक आहे, अशी तिखट प्रतिक्रीया राऊत यांनी दिलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.