www.24taas.com, झी मीडिया
जगातला नंबर एक खेळाडू स्पेनच्या राफेल नडालने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये रॉजर फेडररची विजयी घोडदौड अखेर थांबवली आहे.
नडालने रॉजरला सरळ सेटमध्ये हरवून फायनलमध्ये जागा बनवली आहे.
नडालने फेडररला ७-६, ६-३ आणि ६-३ अशी मात दिली.
वर्षातल्या सर्वात पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रोजर फेडरर चांगल्या फॉर्मात होता. यावरून फेडरर आणि नडाल यांच्यात जोरदार लढत होईल, अशी अपेक्षा फेरडरर आणि नडालच्या फॅन्सना होती.
मात्र ही लढत रंगली नाही. पहिला सेट रोमहर्षक होता आणि टाय ब्रेकरपर्यंत गेला. मात्र नडालने हा सेट जिकंला आणि फेडररला बॅकफूटवर आणलं.
पहिला सेट जिंकल्यानंतर नडाल एका चांगल्या फॉर्ममध्ये आला आणि फेडररला जिंकण्याची नडालने कोणतीही संधी दिली नाही.
...आणि रॉजर फेडरर अवाक झाला
नडालने यानंतर दोन्ही सेट शानदार खेळी करत जिंकले आणि फेडरर फक्त पाहातच बसला. फेडररने यापूर्वी नडाल विरोधात २००७ च्या विम्बल्डन फायनलमध्ये जिंकला होता.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मागील ११ दिवसात फेडरर फारच बदललेला दिसत होता. नवे कोच स्टीफन एडबर्ग यांच्यानुसार फेडररच्या खेळात मोठा सुधार झाला होता.
फेडररने ज्या पद्धतीनं विल्फ्रेड सोंगा आणि ऍण्डी मरेला हरवलं, त्यानंतर अठरावं ग्रॅण्ड स्लॅम फेडरर जिंकेल अशी अपेक्षा त्यांच्या फॅन्सची होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.