www.24taas.com, पुणे
नेहमी आपल्या हसतमुख चेहऱ्याने साऱ्यानाच आपलसं करणार मराठीतील नामवंत अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. नेहमीच उत्साही असे आनंद अभ्यंकर आपल्या नावाप्रमाणे नेहमीच आनंदी राहत असे आणि इतरांनाही आनंद देत असे. त्यामुळे त्यांच्या सहकलाकारांना नेहमीच काम करताना एक प्रकारचा आनंद मिळत असे.
पण म्हणतात ना काळ आला की, त्याच्यासमोर सारेच हतबल होतात. असाच काहीसा प्रकार अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्यासोबत झाला. वॉगनर या गाडीमधून आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा, पत्नी आणि गाडीचा ड्रायव्हर हे प्रवास करीत होते.. मात्र आनंद अभ्यंकर यांनी काय वाटलं कुणास ठाऊक आणि त्यांना ड्रायव्हरला बाजूच्या सीटवर बसायला सांगितले आणि स्वत: गाडी चालवितो असे सांगितले... आणि त्यांनी स्वत: ड्रायव्हिंग करण्यास सुरवात केली. आणि त्यानंतर काळाने त्यांच्यावर झडप घातली या अपघातात स्वत: आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला.
अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्यासमोर ट्रक काळ बनून आला होता. एक्स्प्रेस हायवेवरील डीव्हायडर ओलांडून या ट्रकनं कारला धडक दिली. एकाबाजून कारला जोरदार धडक बसली. आणि त्यांच्यात तिघांचा अंत झाला. आनंद अभ्यंकर यांनी केलेली काही नाटकं, सिनेमे आणि चित्रपटात आपला ठसा उमटवला होता.
मालिका-मला सासू हवी, असंभव, अवघाची हा संसार, फू बाई फू
चित्रपट - स्पंदन, मानिनी मातीच्या चुली, बालगंधर्व
नाटक - कुर्यात सदा टिंगलम, पप्पा सांगा कुणाचे,