पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार मेट्रो

पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी 16 किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण 15 थांबे असतील

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 25, 2012, 08:20 AM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी 16 किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण 15 थांबे असतील.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संयुक्तपणे मेट्रो प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुणे पालिकेनं मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला होता. शहरातली वाहतूक समस्या लक्षात घेता पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशींनी पालिका भवन ते स्वारगेट, निगडी ते पालिका भवन आणि औंध ते रावेत आणि नाशिक फाटा ते मोशी या मार्गावर प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली.
या संपूर्ण मार्गासाठी एकूण चार हजार 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मार्गासाठी एक हजार 188 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र हा प्रकल्प फायद्याचा ठरेल असा दावा केला जातोय.
या मार्गासाठी येणा-या एकूण खर्चापैकी 44 टक्के खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेला करावा लागणार आहे. मात्र यामुळे वाहतूकीची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे.