www.24taas.com,पुणे
रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानंतर आजपासून ख-या अर्थानं ग्राहकांना फटका बसायलाय. तर बँकेच्या सहा संचालकांनी आपले राजीनामे परत घेतलेत. तर आपण बँकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचा इशारा आपण तीन वर्षांपूर्वीच दिला होता, असं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, या प्रकरणी प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झालीये. बँकेच्या 6 संचालकांनी आपले राजीनामे परत घेतलेत. पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि रूपी सहकारी बैंकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानंतर आजपासून ख-या अर्थानं ग्राहकांना फटका बसायला सुरूवात होणार आहे. कर्जाची थकबाकी आणि संचालकांमध्ये असलेल्या वादामुळे आरबीआयनं निर्बंध लादलेत. त्यानुसार पुढल्या 6 महिन्यांत ग्राहकांना जास्तीत जास्त 1 हजार रुपयेच केवळ एकदाच काढता येणार आहेत.
शनिवारी हे निर्बध लादण्यात आले. मात्र त्या दिवशी अर्धाच दिवस बँक उघडी होती. काल रविवारची सुटी होती. त्यामुळे आजपासून ख-या अर्थानं ग्राहकांची पंचाईत होणार आहे. विशेषतः पेन्शनर्सची यामुळे मोठीच अडचण होणार आहे.
रुपी बँकेत 1400 कोटींच्या ठेवी असून 800 कोटींचे कर्जवाटप केलंय. २००२ पूर्वी दिलेल्या कर्जांची योग्य वसुली करता न आल्यामुळे बँक अडचणीत आलीये. राज्यभर रुपी बँकेचे सुमारे ७ लाख ग्राहक आहेत.