www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे वर्धापनदिनानिमित्त त्यांची भुमिका स्पष्ट केली. पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंना काय वाटतं याबाबत त्यांचे मतही जाहीर केले. ‘मी कधीकधी रात्री असा दचकून उठतो, आणि फक्त एका विचाराने एका कल्पनेने दचकून उठतो, की पक्ष स्थापन केला ९ मार्चला आणि १९ मार्चला शिवतीर्थावर सभा आहे मी सांगितलं.’
‘समजा, लोकं नसती आली तर, नुसत्या या कल्पनेनेच भीती वाटते. आणि ते जे काही घडलं, जे काही घडतयं, जे काही घडत जातय... लोकं मला विचारतात, तुमच्यात एवढी हिंमत येते कुठून? ही तुमच्यामुळे येते. जे काही चालू आहे. माझ्या बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांमुळे...’
`मुंबई, ठाणे आणि नाशिक पुरता मर्यादित बोलणारे आता तोंडात बोट घातलं आहे...’ असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेने अल्पवधी काळात जी वाटचाल केली आहे त्याचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे.