मेलबर्न : भारताविरूद्ध सामन्यात रन आऊट होणे महागात पडले असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने पराभवानंतर बोलताना सांगितले. रविवारी भारताने द. आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला. आतपर्यंतचा द. आफ्रिकेची सर्वात वाइट पराभव आहे.
भारताकडून मिळालेल्या ३०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २३ व्या षटकात तिसरा झटका लागला. जेव्हा डिव्हिलिअर्स दुसरी धावा घेताना रन आऊट झाला. त्यानंतर टीम पत्त्याच्या बंगल्यापर्यंत कोसळली. द. आफ्रिकेचा संघ ४१ षटकात १७७ धावांवर बाद झाला. डिव्हिलअर्स पॅव्हेलियन परतल्यानंतर लगेचच डेव्हिड मिलर रन आऊट झाला.
कर्णधार डिव्हिलिअर्सने आपल्या गोलंदाजांची प्रशंसा केली. वेरनान फिलेंडर जखमी झाल्यामुळे आमच्या गोलंदाजीवर परिणाम झाला. मला वाटले, आमच्या गोलंदाजांनी चांगला कमबॅक केला. ही विकेट २७०-२७५ धावांची होती पण भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. स्कोअर ३५० पर्यंत जाऊ शकत होता पण त्यांना ३०७ मध्ये रोखणे आम्हांला जमले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.