विराट कोहलीला मागे टाकून अजिंक्य रहाणे अव्वल

 भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे भारताचा सर्वोच्च रँकिंग मिळविणारा टेस्ट फलंदाज झाला आहे. त्याने १४ स्थानांची उडी मारली आहे. आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये तो १२ व्या स्थानावर पोहचला आहे. त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 

Updated: Dec 9, 2015, 06:59 PM IST
विराट कोहलीला मागे टाकून अजिंक्य रहाणे अव्वल title=

दुबई :  भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे भारताचा सर्वोच्च रँकिंग मिळविणारा टेस्ट फलंदाज झाला आहे. त्याने १४ स्थानांची उडी मारली आहे. आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये तो १२ व्या स्थानावर पोहचला आहे. त्याची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 

रहाणे यापूर्वी २६ व्या स्थानाव होता. पण चौथ्या टेस्टमध्ये १२७ आणि १०० नाबाद धावा केल्याने तो १२ स्थानावर जाऊन पोहचला आहे. तर विराट कोहली यापूर्वी १६ व्या स्थानावर होता. पण त्यानेही चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याला दोन स्थानांचा फायदा झाला. तो आता १४ व्या स्थानी पोहचला आहे. 

त्यामुळे आता ताज्या रँकिंगमुळे विराट कोहली मागे पडला आहे आणि अजिंक्य रहाणे पुढे गेला आहे. 

दुसरीकडे डावखुरा स्पिनर रविंद्र जडेजा टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्यादा पहिल्या दहामध्ये आला आहे. त्याने चार स्थान वर जात सातव्या स्थानावर पोहचला आहे. तर आर. अश्विन क्रमांक एकच गोलंदाज बनला आहे. 

दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी जडेजा ३० व्या स्थानावर होता. तर जलद गोलंदाज उमेश यादव १३ स्थानांच्या फायद्यासह ३२ स्थानावर पोहचला आहे. त्याने शेवटच्या कसोटीत पाच विकेट घेतल्या आहेत. 

कसोटीमध्ये डेल स्टेन हा प्रथम क्रमांकावर आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.