नवी दिल्ली : टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात जबरदस्त कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन हा मॅन ऑफ द सिरीज ठरला. पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विनने हा पुरस्कार तो चेन्नईमधील पुरग्रस्तांना समर्पित केला आहे.
चेन्नईमधील पुरात अश्विन आणि मुरली विजय या दोघांचं कुटुंबीय ही अडकलं होतं. कुटुंबियांसोबत 24 तास अश्विनला संपर्क साधता आला नाही. अशा परिस्थितीतही त्याने पहिल्या डावात अतिशय महत्त्वपूर्ण अर्धशतक ठोकलं.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना 5 लाखांची मदत करणाऱ्या अजिंक्य रहाणे यानेही पुरग्रस्तांसाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं होतं.
टेस्ट सिरीजमध्ये अश्विनने आणखी एक 55 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. अश्विन हा आफ्रिकेविरोधात सर्वात जास्त 31 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या आधी हा रेकॉर्ड इंग्लंडच्या स्टेडथम यांच्या नावावर होता. त्यांनी 1960 मध्ये 27 विकेट्स घेत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.