नवी दिल्ली : सामन्यादरम्यान मुलाखत घेणाऱ्या महिला पत्रकारासोबत फ्लर्ट केल्याप्रकरणी चर्चेत असलेल्या ख्रिस गेलचे आणखी एक प्रकरण समोर आलं. २०१५ क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान वेस्ट इंडिजच्या टीमसोबत काम कऱणाऱ्या एका महिलेने धक्कादायक खुलासा केलाय. द हेराल्डला दिलेल्या माहितीत तिने हा खुलासा केलाय.
टीमसाठी ती काही खाण्याचे सामान घेऊन ड्रेसिंगरुममध्ये गेली होती. तिथे गेल उपस्थित होता. त्यावेळी गेलने मुद्दामहून टॉवेल सोडल्याचा आरोप या महिलेने केलाय.
काही दिवसांपूर्वीच महिला पत्रकारासमोर मुलाखतीदरम्यान डेटिंगचा प्रस्ताव गेलने ठेवला होता. या घटनेनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.
याप्रकऱणी त्याला १० हजार ऑस्ट्रेलिया डॉलरचा दंड ठोठावण्यात आलाय. गेलला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम सिडनी क्रिकेट मैदानावर मॅकग्रा दिवसानिमित्त मॅकग्रा फाऊंडेशनला दान करण्यात येणार आहे.