मुंबई : भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशियाई चँम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
ती सध्या ऑपरेशननंतर मुंबईत आहे. 18 मे पासून थायलंडमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेला हुकणार आहे.
तिनेच हे ट्विटरवरून जाहीर केले, 'मी सरावादरम्यान जखमी झाल्याने गुडघ्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जखम आणि शस्त्रक्रिया पुर्वपदावर येत आहे. मी लवकरच परत येइन.'
Hi everyone, ek update hai. Mujhe recently practice mein injury hua aur ACL ka surgery hua hai. Rehab shuru hai, jaldi wapis aaungi! :)) pic.twitter.com/wr3pRtOzAr
— Dipa Karmakar (@DipaKarmakar) April 4, 2017
दीपा करमाकर ऑलंपिकमध्ये क्वॉलिफाय होणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली होती. त्या स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती.