कॅंन्सर जनजागृतीसाठी दिल्ली डेअरडेविल्सने बदलली जर्सी

दिल्ली डेअरडेविल्स १ मे रोजी होणाऱ्या किंग्स इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात वांगी (लेवेंडर) रंगाचे कपडे घालून मैदानात उतरणार आहे. टीम व्यवस्थापकांच्या मते हा निर्णय कॅंसरबाबत जागृतता पसरवण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे. 

Updated: Apr 29, 2015, 11:53 AM IST
कॅंन्सर जनजागृतीसाठी दिल्ली डेअरडेविल्सने बदलली जर्सी title=

नवी दिल्ली: दिल्ली डेअरडेविल्स १ मे रोजी होणाऱ्या किंग्स इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात वांगी (लेवेंडर) रंगाचे कपडे घालून मैदानात उतरणार आहे. टीम व्यवस्थापकांच्या मते हा निर्णय कॅंसरबाबत जागृतता पसरवण्याच्या हेतूने घेण्यात आला आहे. 

टीम व्यवस्थापनाने त्यांच्या प्रेक्षकांनाही या रंगाचे कपडे घालून हा सामना पाहण्यास येण्याचं आवाहन केलं आहे. प्रेक्षक अशा रंगाची जर्सी स्टॉलवरून खरेदी करू शकतात. 

शुक्रवारी फिरोजशहा कोटला मैदानात होणाऱ्या या मॅचमध्ये कॅंसर पीडित १०० मुलं मैदानात उपस्थित असणार आहेत. दिल्ली सध्या ६ गुणांसह अंक तालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने सात पैकी तीन सामने जिंकले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.