चेन्नई: ढेपाळलेल्या कोलकाता नाईट रायडर्सवर चेन्नईने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला आहे, महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला हरवून यंदाच्या मोसमातला आपला सहावा विजय साजरा केला.
या सामन्यात चेन्नईनं विजयासाठी दिलेलं १३५ धावांचं आव्हान कोलकात्याला पेलवलं नाही, केकेआरला १३२/९ धावाच करता आल्या.
रॉबिन उथप्पाच्या ३९ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता, कोलकात्याचे बाकीचे फलंदाज साफ अपयशी ठरले. दरम्यान, कोलकात्यानं चेन्नईला २० षटकांत सहा बाद १३४ धावांवरच रोखंलं होतं.
ड्यू प्लेसिच्या २९ आणि ड्वेन स्मिथच्या २५ धावांचा अपवाद वगळता चेन्नईच्या इतर सहा फलंदाजांना वीसचा आकडाही ओलांडता आला नाही. कोलकात्याकडून पियुष चावला आणि आंद्रे रसेलनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.