'टीम इंडिया'च्या जर्सीला ग्राहक मिळेनात...

'वर्ल्डकप' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता हळूहळू साऱ्यांवर क्रिकेटचा रंग चढायला सुरूवात होणार अशी आशा होती पण क्रिकेट रसिकांचा सध्याचा रंग जरा वेगळाच दिसतोय.

Updated: Jan 28, 2015, 07:06 PM IST
'टीम इंडिया'च्या जर्सीला ग्राहक मिळेनात... title=

मुंबई : 'वर्ल्डकप' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता हळूहळू साऱ्यांवर क्रिकेटचा रंग चढायला सुरूवात होणार अशी आशा होती पण क्रिकेट रसिकांचा सध्याचा रंग जरा वेगळाच दिसतोय.

 गेल्या वेळेचा वर्ल्ड कप भारतात असल्याने सारा भारतच क्रिकेटमय झाला होता. मात्र, यावर्षी तसं चित्र अजून तरी पहायला मिळत नाहीय. 
 
 'टीम इंडिया'ची ओळख असलेल्या जर्सीला तसं पहायला गेलं तर चांगली मागणी असते. मात्र, यावेळी जर्सीची फारशी विक्री होताना दिसत नाहीय. भारतातील क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईत तर क्रिकेट जर्सीपेक्षा फिफा वर्ल्ड कप दरम्यान फुटबॉलच्या जर्सीची अधिक विक्री झाल्याचं दिसून आलं.

'टीम इंडिया'ची जर्सी दीडशे रुपयांपेक्षाही कमी किंमतीला विकली जात असून ओरिजनल जर्सी ही पाच हजारांपेक्षा कमी आहे. 

त्यामुळे, यावेळी तरी भारतीय क्रिकेट जर्सीला फारशी मागणी नसल्याचचं चित्र आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.