लंडन: इंग्लंडचा लागोपाठ दोन वेळा पराभव झाल्याने निराश झालेले माजी कर्णधार एलेक स्टीवर्टने म्हटलं की, भारतीय संघापासून शिकलं पाहिजे की, एक दिवसीय क्रिकेटमध्ये कसं खेळलं पाहीजे.
भारताने कार्डिफ आणि नॉटिंघममध्ये सुलभ विजय मिळवत, पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पुढे आहे.
स्टीवर्टने ‘मिरर’मध्ये म्हटलं आहे की, ''भारतीय संघला कसोटी मालिकेत आव्हान देणारा हा संघ पूर्णपणे वेगळा दिसत आहे. ते सध्या भारतीय संघाला 50 ओव्हरची क्रिकेट कसं खेळावे हे शिकवत आहे.''
या माजी यष्टिरक्षकाने म्हटलं की, ''मागील आठवड्यात मी इंग्लंडला आणखी उत्कंठापूर्ण आणि सकारात्मक पावले उचलण्यासाठी सांगितले होते. पण अजूनही तीच जुनी कथा चालू आहे.
ते पुन्हा पुन्हा त्याच चूका करत आहे. इंग्लंडला सध्याच्या मालिकेत खेळताना पाहणे, म्हणजे 1990 च्या वेळेस संघ जसा खेळत होता तसे दिसत आहे.''
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.