बासेटेरे : वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी झालेल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा १३९ रननी विजय झाला. या मॅचमध्ये हाशिम आमलानं ९९ बॉलमध्ये ११० रन बनवल्या. आमलाच्या या सेंच्युरीमुळे दक्षिण आफ्रिकेनं ५० ओव्हरमध्ये ३४३ रन बनवल्या.
३४३ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम २०४ रनवर ऑल आऊट झाली. इम्रान ताहिरनं ४५ रन देऊन वेस्ट इंडिजच्या ७ विकेट घेतल्या. वनडेमधली दक्षिण आफ्रिकेच्या बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
१ वनडे क्रिकेटमधली आमलाची ही २३वी सेंच्युरी आहे. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये आमला आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा आमला सर्वाधिक सेंच्युरी मारणारा दुसरा बॅट्समन बनला आहे. आमलापेक्षा एबी डिव्हिलियर्सच्या(२४) सेंच्युरी जास्त आहेत.
२ या सेंच्युरीबरोबरच आमलानं विराट कोहलीचाही रेकॉर्ड तोडला आहे. आमलाला २३ सेंच्युरी मारण्यासाठी कोहलीला १३२ इनिंग लागल्या. विराट कोहलीला २३ सेंच्युरींसाठी १५७ इनिंग लागल्या होत्या. सातव्या सेंच्युरीपासून २३ वी सेंच्युरी आमलानं सर्वात जलद बनवल्या आहेत.
३ या सेंच्युरीनंतर आमलाच्या वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये एक हजार रन बनवल्या आहेत. या हजार रन बनवायला आमलाला १४ इनिंग लागल्या. कोणत्याही टीमविरोधात एवढ्या कमी इनिंगमध्ये हजार रन करण्याचा रेकॉर्डही आमलाच्या नावावर झाला आहे. याआधी विव्हियन रिचर्ड्सनं १५ इनिंगमध्ये इंग्लंडविरोधात हजार रन केल्या होत्या.
४ वेस्ट इंडिजमध्ये आमलाच्या आत्तापर्यंत तीन सेंच्युरी झाल्या आहेत. असं करणारा आमला हा जगातला दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडननंही वेस्ट इंडिजमध्ये ३ सेंच्युरी मारल्या होत्या. हेडनला तीन सेंच्युरी मारालयला १६ इनिंग लागल्या होत्या, तर आमलानं हे रेकॉर्ड फक्त ९ इनिंगमध्ये केलं आहे.