मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या चौथ्या टेस्ट सामन्यात भारतासमोर अडचणी वाढत आहे. वृद्धीमान साहाला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झालेला नसताना मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याचे बातमी विराट कोहलीला ११ खेळाडू निवडण्यात अडचण निर्माण होऊ शकते.
तसेच मुंबईचा मुलगा अजिंक्य राहणेही दुखापतग्रस्त झाल्याने आता या टेस्ट सिझनमध्ये जखमी होणारा ७वा खेळाडू ठरला आहे.
NEWS ALERT - @im_manishpandey replaces @ajinkyarahane88, @imShard come in as back up for @MdShami11 for 4th Test @Paytm #INDvENG pic.twitter.com/eFnCMZSfZj
— BCCI (@BCCI) December 7, 2016
यापूर्वी शिखर धवन, इशांत शर्मा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल आणि वृद्धीमान साहा हे खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते.