दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडनं 50 ओव्हरमध्ये 242 रन बनवल्या आहेत. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अमित मिश्रानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसननं शानदार सेंच्युरी झळकावली. धरमशालातील पहिली वनडे जिंकल्यानंतर दिल्ली सर करण्यासाठी आज टीम इंडिया सज्ज आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग कऱण्यचा निर्णय घेतलाय.