कोलकाता : टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा अनेक वेळा सामना झाला आहे. भारत आतापर्यंत वरचढ ठरलाय. मात्र, उद्या होणाऱ्या महामुकाबळ्याआधी लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.
या दोन्ही संघांमधील पाचवा सामना १९ मार्चला कोलकातात होत आहे. सध्यातरी ओव्हरऑल रेकॉर्ड हा टीम इंडियाच्या फेव्हरमध्ये आहे. पण वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विरोधात पाकिस्तान पराभुत असला तरी भारताने सावध राहिले पाहिजे, असे मत गावसकर यांनी व्यक्त केलेय.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी खेळाडूंना मॅचपूर्वी सावध केले आहे. ते म्हणाले, पाकिस्तानचा भारतातील रेकॉर्ड चांगला आहे. विजयासाठी सर्वोत्कृष्ट भारताला कामगिरी करावी लागेल. शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे.
तर टीम इंडिया मालिकेत विजयाची दावेदार असली तरी कोलकातामध्ये रेकॉर्ड भारताच्या विरोधात गेला आहे. कोलकात्यात अद्याप भारताने पाकला हरवलेले नाही, याची आठवण गावसकर यांनी करुन दिलेय.