श्रीलंकेविरुद्ध भारत विजयी लय कायम राखणार?

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडिया सज्ज झालीये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झालीये. आज या दोन्ही संघादरम्यान पुण्याच्या गहुंजे मैदानावर पहिला टी-२० सामना होतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजयरथ कायम राखण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. 

Updated: Feb 9, 2016, 05:10 PM IST
श्रीलंकेविरुद्ध भारत विजयी लय कायम राखणार? title=

पुणे : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडिया सज्ज झालीये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झालीये. आज या दोन्ही संघादरम्यान पुण्याच्या गहुंजे मैदानावर पहिला टी-२० सामना होतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजयरथ कायम राखण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. 

श्रीलंकेविरुद्धची या मालिकेकडे आशिया आणि टी-२० वर्ल्डकपसाठी तयारीच्या दृष्टीने पाहिले जातेय. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. या मालिकेसाठी कसोटी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. कोहलीच्या अनुपस्थिततही टीम इंडियाची फलंदाजी मजबूत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त खेळ करणाऱे रोहित शर्मा आणि शिखर धवन सध्या फॉर्मात आहेत. सलामीवीराची भूमिका हे दोघेही निभवतील. त्यानंतर सुरेश रैना, एमएस धोनी आणि युवराज मधली फळी सांभाळतील. अजिंक्य रहाणेही फिट झालाय. त्यामुळे तोही मधल्या फळीत असेल. 

वेगवान गोलंदाजीची धुरा आशिष नेहरा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असेल. त्यांना टी-२० वर्ल्डकपसाठी संघात न निवडलेल्या भुवनेश्वर कुमारची साथ मिळेल. स्पिनरची जबाबदारी रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजावर असेल. याशिवाय अंतिम ११ मध्ये हरभजन सिंग आणि आयपीएल लिलावातील सर्वात महागडा क्रिकेटपटू पवन नेगीचाही समावेश होण्याची शक्यता आहे. 

२०१४च्या टी-२० वर्ल्डकपनंतर श्रीलंका आणि भारता पहिल्यांदा आमनेसामने येतायत. श्रीलंकेने तो वर्ल्डकप जिंकला होता.