मुंबई : भारतीय टीम सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरोधात भारत चार टेस्ट मॅच खेळणार आहे. भारताने पहिला टेस्ट जिंकली असून दुसरी टेस्ट अजून सुरु आहे.
भारत विश्व चँपियन वेस्टइंडीजसोबत अमरिकेत भिडणार आहे. 27 आणि 28 ऑगस्टला २ टी-20 मॅच रंगणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) चे अध्यक्ष अनुराग ठाकुर यांनी मंगलवारी बोर्डच्या बैठकीत याची घोषणा केली.
अमरिकेतील फोर्ट लौडरडेल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्कमध्ये हे २ सामने खेळले जाणार आहे. नव्या जागी आणि नव्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या सामन्यांचं आयोजन केलं असल्याचं अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे.
अमरिकेत क्रिकेटच्या चाहत्यांसाठी दोन चँपियन संघ भिडतांना दिसणार आहेत. आम्ही याला अमेरिकेतील वार्षिक इवेंटच्या रूपात विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहोत.