मेलबर्न : विश्व चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सर्व देश या विजय उत्साहात न्हाऊन निघाला पण विजय साजरा करण्यासाठी धोनी अँड कंपनी यांच्याकडे वेळच नव्हता. अॅडलेडमध्ये रात्री उशीरापर्यंत भारतीय क्रिकेट प्रेमी विजय साजरा करीत होता. पण क्रिकेटर या हाइपपासून दूर जाऊ इच्छित होते.
टीमच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्याने सांगितले की, हा फक्त पहिला सामना होता. विजयाचा आनंद सर्वांना होता पण विजय साजरा करण्याची काहीच गरज नाही. आम्ही विश्व चषक जिंकला नाही. त्यामुळे कोणत्या प्रकारे विजय साजरा करण्यात आला नाही. खेळाडू थकले होते त्यांना आरामाची गरज होती. त्यामुळे सर्वजण आपआपल्या रूममध्ये गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला सकाळी अॅडिलेडवरून मेलबर्नसाठी फ्लाइट घ्यायची होती. आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून होते, त्यामुळे सर्वांनी मॅचनंतर आपले सामान आवरले. सर्वांना झोपेची गरज होती.
टीम मॅनेजमेंटनुसार क्रिकेटपासून काही वेळाचा ब्रेक घेतला जाऊ शकतो. पण जल्लोष करण्याची काही गरज नाही. कारण पुढील सामना हा दक्षिण आफ्रिकेशी आहे. त्यांच्याकडे डिव्हिलिर्स आणि डेल स्टेन सारखे खेळाडू आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.