टीम इंडियाचा दारूण पराभव, चांगल्या सुरूवातीनंतर मॅच १८ रन्सनी गमावली

चांगल्या सुरवातीनंतर मधल्या मिडल ऑर्डर बॅट्समनच्या हाराकीरीमुळं तिसऱ्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर १८ रन्सनी विजय मिळवतला. सीरिजमध्ये आफ्रिकेनं २-१ नं आघाडी घेतली. 

Updated: Oct 18, 2015, 10:02 PM IST
टीम इंडियाचा दारूण पराभव, चांगल्या सुरूवातीनंतर मॅच १८ रन्सनी गमावली title=

राजकोट: चांगल्या सुरवातीनंतर मधल्या मिडल ऑर्डर बॅट्समनच्या हाराकीरीमुळं तिसऱ्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर १८ रन्सनी विजय मिळवतला. सीरिजमध्ये आफ्रिकेनं २-१ नं आघाडी घेतली. 

भारतातर्फे रोहित शर्मा(६५), विराट कोहली(७७), एम.एस धोनी(४७) यांचे पर्यत्न जिंकण्यासाठी अपुरे पडले. शिखर धवन(१३), सुरेश रैना(००), अजिंक्य रहाणे(०४) अपयशी ठरले. हरभजन सिंह(२०) अक्षर पटेल (१५) रन्सवर नॉटआऊट राहिले. 

आणखी वाचा - LIVE SCORE : तिसरी वनडे | भारत विरू्ध दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनं अचुक मारा करत भारतीय बॅट्समनना रोखलं, आफ्रिकेतर्फे मोर्ने मॉर्केलनं ४ विकेट्स मिळवल्या तर इम्रान ताहिरनं आणि जीन पॉल ड्युमिनीनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.   

त्याआधी, क्विंटन डीकॉकची सेंच्यूरी आणि फाफ डू प्लेसिसची हाफसेंच्युरीच्या आधारे दक्षिण आफ्रिकेनं ५० ओव्हरमध्ये सात विकेट गमावत २७० रन्स केले. भारतीय बॉलर्सनी अचूक मारा करत आफ्रिकेच्या बॅट्समनना लगाम लावला.

आणखी वाचा - धोनी - विराट एकसाथ तो क्या हो बात...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.