IPL-10 : स्ट्राइक जवळ ठेवण्यासाठी पोलार्डने दिला 'धोका', WATCH VIDEO

 आयपीएल १०च्या ५१ व्या सामन्यात एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या ओव्हरमध्ये १६ धावा पाहिजे होत्या. स्टाइक किरॉन पोलार्डकडे होती, दुसरीकडे हरभजन सिंग होता. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 12, 2017, 08:40 PM IST
 IPL-10 : स्ट्राइक जवळ ठेवण्यासाठी पोलार्डने दिला 'धोका', WATCH VIDEO title=

नवी दिल्ली :  आयपीएल १०च्या ५१ व्या सामन्यात एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या ओव्हरमध्ये १६ धावा पाहिजे होत्या. स्टाइक किरॉन पोलार्डकडे होती, दुसरीकडे हरभजन सिंग होता. 

किंग्ज इलेवनकडून पंजाबकडून मोहीत शर्मा गोलांदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर पोलार्डने लॉन्ग ऑनकडे चेंडू मारला. दोन धावा पाहिजे होत्या, त्याने पोलार्ड स्टाइकवर येऊ शकतो. त्यामुळे हरभजनने दुसऱ्या धावेसाठी पोलार्डला कॉल केला. पोलार्ड रिपॉन्स केला पण तो पहिला रन पूर्ण करू शकत नव्हता. म्हणून त्याने पॉपिंग क्रिजपर्यंत पोहचण्यापूर्वी अर्ध्यामध्येच परतला...

 

पोलार्डने जाणूनबूजून केलं असं...

ज्याने पण हे दृश्य पाहिले असेल त्याने लक्ष दिले असेल तर त्याचे म्हणणे आहे की पोलार्डने हे जाणून बुजून केले. कारण त्याला स्ट्राइक स्वतःजवळ ठेवायची होती.  यावेळी पोलार्डने चलाखी दाखवली. त्यानंतर त्याने षटकार लगावला पण स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्यासाठी त्याने तिसऱ्या चेंडूलाही फटका लगावला. पण त्याने धाव काढली नाही. त्यानंतर पुढील ३ चेंडूत पोलार्डला एकच धावा काढता आली. त्यामुळे मुंबई ७ धावांनी पराभूत झाली.