बर्मिंघमः महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट टीमचा सगळ्यात जास्त यशस्वी कर्णधार झाला आहे. धोनीच्या मते त्याच्या पूर्वीचे आणि सध्याच्या सहकाऱ्यांमुळं मी भारतीय क्रिकेट टीमचा यशस्वी कर्णधार आहे.
91 मॅचेसमध्ये विजय मिळवून धोनी हा सगळ्यात जास्त यशस्वी कर्णधार झाला आहे. धोनीच्या मते मी जेव्हा भारतीय टीमचं नेतृत्व स्वीकारलं होतं, तेव्हा मला सगळयात चांगली टीम मिळाली होती. मात्र चढ - उतार हे जीवनात येतच असतात. मी याबाबत सगळ्यांना धन्यवाद देतो कारण, मी ज्याच्या बरोबर क्रिकेट खेळलो त्याच्या योगदानाशिवाय हे शक्य नव्हतं. सीनियर आणि ज्यूनिअर या सगळ्यांसोबत खेळताना मला खूप आंनद होत होतो. माझी टीमही खूप यशस्वी टीम आहे. यश अपयश हे तर येतच असतं, पण सगळ्यात जास्त सकारात्मक दृष्टीकोन हा आहे, असं मत धोनीनं इंग्लंडमध्ये मॅच जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
धोनीच्या मते इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये 1-3 या झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीमनं आपल्या खेळात बदल केलाय आणि टेस्टमध्ये केलेल्या चुकांना लक्षात घेता वनडे क्रिकेटमध्ये खेळ सुधारत वनडे मालिकेवर विजय मिळवला. हे सगळं सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यामुळं झालं आहे. पहिल्या वनडे मॅचनंतर आम्ही आमच्या खेळात सुधार करत गेलो आणि बॉलर्सच्या चांगल्या कामगिरीमुळं आम्ही वनडे मॅचेसमध्ये चांगली कामगीरी करत राहिलो.
चौथ्या वनडे मॅचमध्ये अंजिक्य रहाणेच्या शतकानं आम्हाला ओपनिंगची सुरुवात चांगली मिऴाली. यामुळं आम्हाला या मॅचमध्ये चांगली पकड मिळण्यात यश मिळालं. पण आम्हाला हे प्रत्येक मॅचमध्ये करावं लागेल तेव्हाच भारतीय टीम खऱ्या अर्थानं मजबूत टीम म्हणून प्रसिध्द होईल. हे सगळं कठीण वाटेल पण आम्हाला हे करावं लागेल. चांगल्या भागीदारीमुळं आम्ही वनडेमध्ये मजबूत संघ म्हणून भारतीय टीमच्या दबदबा कायम ठेवू शकलो. भारतीय संघाकडे पहिल्या 10 ओव्हरमध्ये चांगले रन बनवणारे बॅट्समन आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.