न्यूझीलंडच्या विचित्र विजयाने मॅक्युलम हैराण

 न्यूझीलंडचा जादुई कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आज वर्ल्ड कपमध्ये इंग्लड विरूद्ध मिळालेला विजय विचित्र यश असल्याचे म्हटले आहे. 

Updated: Feb 20, 2015, 03:56 PM IST
न्यूझीलंडच्या विचित्र विजयाने मॅक्युलम हैराण title=

वेलिंग्टन :  न्यूझीलंडचा जादुई कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आज वर्ल्ड कपमध्ये इंग्लड विरूद्ध मिळालेला विजय विचित्र यश असल्याचे म्हटले आहे. 

विश्व विजेत्याच्या खिताबाचे प्रबळ दावेदार असलेल्या न्यूझीलंडने लगोपाठ तिसरा विजय मिळविला आहे. या सामन्यात केवळ ४५.४ ओव्हर टाकण्यात आल्या. टीम साऊदीने या सामन्यात ३३ धावा देऊन सात विकेट घेतल्या. तर मॅक्युलमने १८ चेंडूत वर्ल्ड कपमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने २५ चेंडूत ७७ धावांची धडाकेबाज खेळी केली. 

सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात तो म्हणाला, हा खूप जबरदस्त विजय आहे. इंग्लड टीम लय प्राप्त करण्यात झगडत होती. सामनावीर टीम साऊदीबद्दल तो म्हणाला, अनेक वर्षांपासून मी अशी शानदार स्पेल पाहिला नाही. तो बऱ्याच काळापासून चांगली गोलंदाजी करीत आहे. त्याच्या चेंडूंना चांगला स्विंग मिळत होता. 

तो म्हटला इतक्या अंतराने जिंकणे खूपच विचित्र आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.