लॅंकेस्टर : भारतीय संघ आता इंग्लड दौऱ्यावर जात आहे. मात्र, नवख्या खेळाडूंपुढे मोठे आव्हान असणार आहे. टीम इंडियामध्ये कसोटी सामने खेळण्याचा फारसा अनुभव नसलेले खेळाडू यांची निवड झाली आहे. त्यामुळे इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे आव्हानात्मक आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे.
इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात प्रथमच कसोटी मालिका हरण्याच्या नामुष्की आली. मात्र यामुळे इंग्लंडला कमी लेखणे योग्य ठरणार नाही, असे धोनी म्हणाला. टीम इंडियाला याआधीच्या इंग्लंडच्या दौऱ्यात 4-0 असा लाजिरवाना पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांच्या मायदेशातील परिस्थितीची अधिक चांगली जाण आहे. आम्ही अनेक काळानंतर कसोटी खेळणार आहोत. यामुळे आमच्यासाठी हे एक आव्हान असणार आहे, असे धोनी म्हणाला.
टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक टी-20 सामना खेळणार आहे.
टीम इंडियाचा संघ -
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, ईश्वर पांडे, स्ट्युअर्ट बिन्नी, वरुण अॅरॉन, वृद्धिमान शाह आणि पंकज सिंग
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.