मुंबई: आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये बॉलीवूड गाण्यांचा तडका पाहायला मिळणार नाही. सिंगर्स असोसिएशनच्या परवानगीशिवाय आयपीएलमध्ये कोणतंही बॉलीवूड संगीत वाजवू नका असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि आयपीएलच्या टीम्सना दिले आहेत.
द इंडियन सिंगर्स राईट्स असोसिएशननं आयपीएलमध्ये बॉलीवूड संगीत वाजवू नये यासाठी याचिका दाखल केली होती. अशी गाणी वाजवणं म्हणजे कलाकारांच्या अधिकाराचं हनन असल्याचा असोसिएशनचा दावा आहे.
यावर सुनावणी करताना 19 एप्रिलपर्यंत बॉलीवूड गाणी वाजवू नका असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 एप्रिललाच होणार आहे. यादिवशी बीसीसीआयलाही उत्तर द्यावं लागणार आहे.