दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलकडून पाकिस्तानचा स्पिनर यासिर शाहचे तात्पुरते निलंबन कऱण्यात आले आहे. अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप शहावर असल्याने त्याला रविवारी निलंबित कऱण्यात आले.
१३ नोव्हेंबर २०१५ मध्ये सामन्याद्वार यासिरच्या चाचणीसाठीच्या सँपलमध्ये क्लोरटॅलीडेन नावाचे ड्रग आढळले होते. यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आलीये.
दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय येईपर्यत यासिरवर ही बंदी कायम राहणार आहे. या प्रकरणात यासिर दोषी आढळल्यास त्याच्यावर आयसीसीच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. यावर यासिरची क्रिकेटमधील कारकीर्द अवलंबून आहे.