नवी दिल्ली: क्रिकेटमधील देव अर्थात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील विविध पैलू आता पुस्तकातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे खूद्द सचिन तेंडुलकर त्याची आत्मकथा लिहिणार असून ६ नोव्हेंबर रोजी दिमाखदार सोहळ्यात सचिनच्या आत्मकथेचं प्रकाशन होणार आहे.
एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतकांचा विश्वविक्रम रचणारा भारत रत्न सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. मुंबईतील मैदानापासून सातत्त्यपूर्ण खेळी करत देशविदेशातील मैदान गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरनं सातत्त्यपूर्ण खेळी करत क्रिकेटवर स्वतःची छाप पाडली. सचिनचा हा प्रवास आता पुस्तकातून उलगडणार आहे.
सचिन 'प्लेईंग इट माय वे' या आत्मकथेतून त्याच्या कारकिर्दीचा प्रवास उलगडणार आहे. 'या आत्मकथेद्वारं आजपर्यंत कोणालाची माहित नसलेले आयुष्यातील काही प्रसंग सर्वांसमोर मांडणार आहे, असं सचिन सांगतो. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणंच लिखाण करतानाही मला प्रामाणिकपणा दाखवावा लागेल हे सांगायला तो विसरत नाही. माझा तीन दशकांचा प्रवास एका पुस्तकात मांडणं कठीण असलं तरी माझ्या चाहत्यांसाठी मी हे आव्हान स्वीकारलं, असं सचिन नमूद करतो.
या पुस्तकाचं प्रकाशक होडर अँड स्टेनन हे आहेत. याविषयी माहिती देताना प्रकाश ब्लूम फिल्ड म्हणाले, सचिनची आत्मकथा नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. भारत आणि जगभरात एकाच वेळी या पुस्तकाचं प्रकाशन होईल.
#PlayingitMyWay, my autobiography will be available on Nov 6th. Here’s a little preview #Excited ! pic.twitter.com/e7mZSQdlmQ
— sachin tendulkar (@sachin_rt) September 2, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.