मुंबई : गंगा स्वच्छ ठेवा, गंगा नदीत प्रदूषण करू नका, याचे धडे लवकरच सचिन तेंडूलकर देण्याची शक्यता आहे. कारण गंगा स्वच्छता अभियानाचा सदिच्छा दूत म्हणून सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यात येणार आहे.
गंगा स्वच्छता अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. मोदींनी पंतप्रधान होताच या अभियानाची घोषणा केली होती. पण गेल्या तीन वर्षांत गंगा स्वच्छता मोहिमेला म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे यासंदर्भातली जनजागृती करण्यासाठी आता सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात सचिनशी बोलणी सुरू असल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे. सचिनचाही त्याला चांगला प्रतिसाद असल्याचं सांगण्यात आलं आहे.