मुंबई : आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी सगळ्याच क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. पण लिलावाआधीच शाहरुख खाननं भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला केकेआरसाठी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. धोनीला विकत घेण्यासाठी मी माझा पायजमाही विकीन असं वक्तव्य शाहरुख खाननं केलं आहे.
आयपीएलच्या पहिल्या आठ मोसमामध्ये धोनीनं चेन्नई सुपरकिंग्जचं नेतृत्त्व केलं. या आठ मोसमांपैकी दोनवेळा चेन्नईला आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात यश आलं. पण सुप्रीम कोर्टानं चेन्नई सुपरकिंग्जवर बंदी घातल्यामुळे आता धोनी पुण्याच्या टीमकडून खेळतो आहे. या मोसमामध्ये पुण्याच्या मालकांनी धोनीकडून कर्णधारपद काढून घेतल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.