व्हिलीयर्सही दुखापतग्रस्त, बँगलोरचं कर्णधारपद वॉटसनकडे

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा प्रभारी कर्णधार ए.बी.डी.व्हिलीयर्स जखमी असल्याने पहिला सामना खेळणार नाहीये. कर्णधार विराट कोहली जखमी असल्याने त्याच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्व ए.बी.डी.व्हिलीयर्सकडे दिलं होतं.

Intern Intern | Updated: Apr 5, 2017, 05:32 PM IST
व्हिलीयर्सही दुखापतग्रस्त, बँगलोरचं कर्णधारपद वॉटसनकडे title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा प्रभारी कर्णधार ए.बी.डी.व्हिलीयर्स जखमी असल्याने पहिला सामना खेळणार नाहीये. कर्णधार विराट कोहली जखमी असल्याने त्याच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्व ए.बी.डी.व्हिलीयर्सकडे दिलं होतं.

मात्र आता हेच नेतृत्व शेन वॉटसनकडे सोपवण्यात आलंय. विराट किंवा व्हिलियर्स परतेपर्यंत वॉटसनच संघाची धुरा सांभाळेल. याआधी त्याला राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्त्वाचा अनुभव आहे.

दरम्यान विराट त्याच्या आजारपणातून पुर्वपदावर येतोय. तरीही पहिले दोन आठवडे तो खेळू शकणार नाही. व्हिलियर्सही लवकरच संघांकडे येईल. त्याने स्वत:च हे ट्विटमधून सांगितले.

संघातील दोन मुख्य खेळाडू नसल्याने संघात आणि पॅव्हिलियनमध्येही उत्साहाची कमी जाणवेल. इतकंच नाही तर सरफराज खान या तरुण खेळाडू सरावादरम्यान जखमी झाला. याकारणाने तो संपुर्ण टुर्नामेंट खेळू शकणार नाही.

आजपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमधून बऱ्याचशा भारतीय खेळाडूंनी या ना त्या कारणानी माघार घेतलीय. त्यात मुरली विजय, के.एल. राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश आहे.