सुरेश रैनाला बीसीसीआयचा जोरदार धक्का

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला बीसीसीआयनं जोरदार धक्का दिलाय. 

Updated: Nov 10, 2015, 08:06 PM IST
सुरेश रैनाला बीसीसीआयचा जोरदार धक्का  title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला बीसीसीआयनं जोरदार धक्का दिलाय. 

बीसीसीआयनं नुकतीच एक नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली. पहिल्यांदा या लिस्टमध्ये सुरेश रैनाच्या नावाचा समावेशच नव्हता. त्यानंतर काही वेळेनंतर ही लिस्ट अपडेट करण्यात आली. आणि सुरैश रैनाला बी ग्रेडमध्ये स्थान दिलं गेलं. 

गेल्या सोमवारी मुंबईत बीसीसीआयची वार्षिक बैठक पार पडली. यानंतर क्रिकेटर्सची नवी कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर करण्यात आली. 

खराब फॉर्मशी झगडणाऱ्या रैनाला ए ग्रेड लिस्टमधून हटवून बी ग्रेडमध्ये स्थान दिलं गेलंय. रैनाशिवाय बॉलर भुवनेश्वर कुमारलाही बी ग्रेडमध्ये ढकलण्यात आलंय. तर दुसरीकडे मिडल ऑर्डर बॅटसमन अजिंक्य राहाणे यांना त्यांच्या बढिया कामगिरीचा मोबदला मिळालाय. त्यांना धोनी, विराट आणि अश्विन यांच्यासोबत ग्रेड ए मध्ये ठेवण्यात आलंय. 

पुरुष क्रिकेट टीम
'ग्रेड ए' मधील खेळाडू 
मानधन - एक कोटी रुपये 
क्रिकेटर्स - एमएस धोनी, विराट कोहली, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे

'ग्रेड बी' मधील खेळाडू 
मानधन - ५० लाख रुपये
क्रिकेटर्स - अंबाती रायुडू, रोहित शर्मा, मुरली विजय, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी

'ग्रेड सी' मधील खेळाडू
मानधन - २५ लाख रुपये
क्रिकेटर्स - अमित मिश्रा, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, रिद्धिमान साहा, मोहित शर्मा, वरुण एरॉन, कर्ण शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, धवल कुलकर्णी, हरभजन सिंह, एस. अरविंद

महिला क्रिकेट टीम
'ग्रेड ए' मधील खेळाडू 
मानधन - १५ लाख रुपए
क्रिकेटर्स : मिताली राज, झूलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, एमडी थिरुशकामिनी

'ग्रेड बी' मधील खेळाडू 
मानधन - १० लाख रुपए
क्रिकेटर्स : स्मृति मंडाना, राजेश्वरी गायकवाड़, पूनम यादव, एकता बिष्ट, वेदा कृष्णमूर्ति, निरंजना नागराजन, पूनम राऊत

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.