मुंबई : विंडीजविरुद्ध सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आठ ऑक्टोबरपासून सुरु होणा-या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. इंग्लडविरोधात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली असल्याने वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
आर. अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी टीममध्ये अपेक्षेप्रमाणे मुरली विजय़ला स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कुलदीप या एकमेव नव्या चेह-याला टीममध्ये संधी मिळाली आहे. पहिल्या तीन वन-डे कोच्ची, दिल्ली आणि शाखापट्टणमध्ये होणार आहेत.
वन-डेची टीम इंडिया
मुरली विजयला टीममध्ये संधी देताना तीन वन-डेसाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. यात खालील खेळाडूंचा समावेश आहे.
- महेंद्रसिंग धोनी
- विराट कोहली
- अजिंक्य रहाणे
- सुरेश रैना
- अंबाती रायडू
- मुरली विजय
- रवींद्र जाडेजा
- अमित मिश्रा
- भुवनेश्वर कुमार
- मोहम्मद शमी
- मोहित शर्मा
- उमेश यादव
- शिखर धवन
- कुलदीप यादव
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.