ऑल स्टार क्रिकेट: वॉर्न वॉरियर्सकडून सचिन ब्लास्टर्सचा व्हाईट वॉश

क्रिकेट ऑलस्टार लीगच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये वॉर्न वॉरियरर्सनं बाजी मारली. सचिन ब्लास्टर्सकडून सचिन आणि गांगूलीनं धडाकेबाज बॅंटीग करत विजयासाठी २२० रन्सचं अव्हान वॉर्न वॉरियरर्स समोर ठेवलं पण हे आव्हान वॉर्न वॉरियरर्सनं १९.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. ४ विकेट्सनं ही मॅच वॉर्न वॉरियर्स जिंकले.

Updated: Nov 15, 2015, 06:02 PM IST
ऑल स्टार क्रिकेट: वॉर्न वॉरियर्सकडून सचिन ब्लास्टर्सचा व्हाईट वॉश title=

लॉस एंजेलिस: क्रिकेट ऑलस्टार लीगच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये वॉर्न वॉरियरर्सनं बाजी मारली. सचिन ब्लास्टर्सकडून सचिन आणि गांगूलीनं धडाकेबाज बॅंटीग करत विजयासाठी २२० रन्सचं अव्हान वॉर्न वॉरियरर्स समोर ठेवलं पण हे आव्हान वॉर्न वॉरियरर्सनं १९.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. ४ विकेट्सनं ही मॅच वॉर्न वॉरियर्स जिंकले.

आणखी वाचा - VIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल

३ मॅचच्या या सीरिजमध्ये सचिन ब्लास्टर्सना एकही मॅच जिंकता आला नाही. वॉर्न वॉरियरर्सनं ही सीरिज ३-० नं जिंकली.

ख्यातनाम माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या ऑल स्टार्स क्रिकेट टी - २० मालिकेतील तिसरा व अंतिम सामना अमेरिकेतील लॉस एंजेल्समध्ये रंगला. सचिन तेंडुलकरच्या सचिन ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन ब्लास्टर्सनं २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावत २१९ रन्स केलेत. वॉर्न वॉरियर्सतर्फे व्हिटोरीनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 

आणखी वाचा - Video : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स दुसरा T-20 Highlights

सचिन ब्लास्टर्सच्या २२० रन्सचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या शेन वॉर्नच्या वॉर्न वॉरियर्सची सुरुवात फारशी चांगली नव्हती. अॅम्ब्रोजनं पहिल्याच बॉलवर मायकल वॉनला एलबीडब्लू आऊट केलं. यानंतर सायमंड्सनं १९ बॉल्समध्ये ३१ रन्स केले. मात्र संघाच्या ५० रन्स झाले असतानाच सायमंड्स बाद झाला. मॅथ्यू हॅडनही स्वस्तात तंबूत परतला. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यावर वॉर्न वॉरियर्सची मदार कुमार संगकारावर होती. त्यानं २१ बॉलमध्ये ४२  रन्स केले. संगकारा आऊट झाल्यावर सचिन ब्लास्टर्सच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र त्यानंतर  रिकी पॉटींग आणि जॅक कॅलिसनं सहाव्या विकेटसाठी ८८ रन्सची खेळी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. कॅलिसनं ४७ तर पॉटिंगनं नाबाद ४३ रन्सची खेळी केली. वॉर्न वॉरियर्सनं चार गडी आणि एक चेंडू राखून सचिन ब्लास्टर्सवर विजय मिळवला. कॅलिसला सामनावीराचा तर संगकाराला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.