मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मॅचनंतर न्यूज चॅनलवर लाईव्ह चर्चा करत असताना वसीम अक्रमच्या कॅमेरासमोर एक जण आला आणि त्यानं वसीमला हटवलं. या सगळ्या प्रकारामुळे वाद निर्माण झाला होता. पण यावर आता खुद्द वसीम अक्रमनंच स्पष्टीकरण दिलं आहे.
घडलेला हा प्रकार मला लक्ष्य करण्यासाठी केला गेला नव्हता, असं ट्विट वसीम अक्रमनं केलं आहे. तसंच माझ्याबाबत काळजी केल्याबद्दल वसीमनं चाहत्यांनाही धन्यवाद दिले आहेत.
The incident that took place in Mumbai was not directed at me and has since been professionally dealt with. Thank you for all your concern.
— Wasim Akram (@wasimakramlive) March 28, 2016
या सगळ्या प्रकरणावर चॅनलचे अँकर विक्रांत गुप्ता यांनीही ट्विट केलं आहे. वसीमला कोणीही हातदेखील लावला नाही. दारु प्यायलेल्या एका व्यक्तीनं कॅमेरासमोर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला, असं विक्रांत गुप्ता म्हणाले आहेत.
About last night, nothing happened to @wasimakramlive n nobody even touched him. 1 drunkard created scene seeing live cameras for attention
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) March 28, 2016