मुंबई: दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज आणि आयपीएलचा सर्वात महाग खेळाडू युवराज सिंगची बॅट बऱ्याच दिवसांनी मुंबईविरुद्धच्या सामन्यात तळपली. युवीने त्यावेळी रन बनवले ज्यावेळी दिल्लीचे बाकीचे फलंदाज अपयशी होत होते. सामना संपल्यानंतर युवीने सांगितले की, आपल्या फलंदाजीतून समीक्षकांना उत्तर देईन.
मंगळवारी वानखेडे स्टेडिअमवर युवीच्या खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने १५२ धावा बनवल्या. या धावांचा पाठलाग करतांना अंबाती रायडू आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने हे लक्ष १९.३ षटकांत पूर्ण केलं.
सामना संपल्यानंतर बोलतांना युवराज बोलला की, माझं काम क्रिकेट खेळणं आहे. समीक्षकांचं काम लिहिणं आहे. त्यामुळे वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्सवर माझ्याबद्दल काय येतं याकडे मी लक्ष देत नाही, माझ्याकडे तेवढा वेळही नाही. माझं लक्ष केवळ माझ्या खेळावर आहे.
आयपीएल-८मध्ये दिल्लीने १० सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकले आहेत. दिल्लीचे आणखी चार सामने शिल्लक आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हे चारही सामने जिंकणे दिल्लीला गरजेचे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.