'चक दे' गर्ल सागरिकाला डेट करतोय झहीर खान?

बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे समीकरण काही वेगळे नाही. नुकताच क्रिकेटपटू युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा पार पडला. 30 नोव्हेंबरला दोघांनी गुरुद्वारात लग्न केले. त्यानंतर गोव्यामध्ये त्यांचा शानदार सोहळा पार पडला. 

Updated: Dec 8, 2016, 09:39 AM IST
'चक दे' गर्ल सागरिकाला डेट करतोय झहीर खान? title=

मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे समीकरण काही वेगळे नाही. नुकताच क्रिकेटपटू युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा पार पडला. 30 नोव्हेंबरला दोघांनी गुरुद्वारात लग्न केले. त्यानंतर गोव्यामध्ये त्यांचा शानदार सोहळा पार पडला. 

यात अनेक क्रिकेटपटूंसह बॉलीवूड अभिनेत्रींनीही हजेरी लावली होती. यावेळी विराट-अनुष्काच्या जोडीसह या सोहळ्यात आणखी एका जोडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका एकत्र या सोहळ्यात दिसल्याने उपस्थित साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. झहीर खान सागरिकाला डेट करत असल्याच्या चर्चाही सध्या जोरदार रंगल्यात. 

सागरिका क्रिकेटर आणि अॅक्टर अंगद बेदीची जवळची मैत्रीण आहे. त्यांनीच सागरिकाची झहीरशी ओळख करुन दिली होती. दीड वर्षापूर्वी दोघांची भेट झाली होती. दरम्यान, त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे समजतेय.