www.24taas.com , वृत्तसंस्था, सॅनफ्रान्सिस्को
दिवसेंदिवस हॅकर्स हल्ले वाढतांना दिसतायेत. काही दिवसांपूर्वी ट्रू-कॉलर अॅप हॅक झालं होतं. आता मात्र हॅकर्सनी अॅडोब या कंपनीवर सायबर हल्ला करून कंपनीची गुप्त माहिती चोरल्याचं वृत्त कळतंय.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या गुप्त माहिती सोबतच हॅकर्सनी जवळपास ३० लाख ग्राहकांची क्रेडिट कार्डविषयक माहितीही चोरल्याचं कळतंय. याशिवाय, अॅडोबच्या अनेक उत्पादनांचे गुप्त नंबरही हॅकर्सनी चोरल्याचं स्पष्ट झालंय.
या चोरीचा कंपनीला जोरदार आर्थिक फटका बसण्याची शक्यीता सूत्रांनी वर्तविली आहे. अॅडोबच्या संगणक सुरक्षा समितीस कंपनीची बहुमूल्य माहिती सायबर हल्ला करून चोरण्यात आल्याचं आढळून आलंय. यामध्ये ग्राहकांची माहिती, तसंच कंपनीच्या उत्पादनांची माहितीही चोरण्यात आल्याचं आढळून आलं. या संदर्भात इतर सुरक्षाविषयक संस्थांच्या साहाय्यानं लगेचच चौकशी सुरू करण्यात आल्याचं कंपनीच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय.
या चोरीच्या पार्श्वाभूमीवर ग्राहकांना ई-मेलद्वारं माहिती देऊन सावध करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.