www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुण्यात सुरु करण्यात आलेल्या `निर्भया : बी फिअरलेस` या अॅपला मोठा प्रतिसाद मिळाला. या अॅपच्या माध्यमातून आता ‘मार्क युवर सिटी सेफ’ ही मोहीम हाती घेण्यात आलीय. यामुळे आपल्या शहरातील असुरक्षित जागांची माहिती महिलांना मिळणार आहे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे ‘निर्भया : बी फिअरलेस’ हे अॅप... पुण्यातील स्मार्ट क्लाऊड ‘इन्फोटेक’ने गेल्या वर्षी महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे अॅप सुरु केलाय... एखाद्या धोक्याच्या क्षणी मोबाईल विशिष्ट पद्धतीने हलविल्यास तसा मेसेज संबंधित तरुणीच्या अथवा महिलेच्या नातेवाईक आणि कुटुंबियांना मिळण्याची सुविधा या ‘अॅप’मध्ये आहे.
मात्र, आत्ता एवढ्यावरच न थांबता स्मार्ट क्लाउड ‘इन्फोटेक’ने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अजून एक पाऊल उचललं आहे. कंपनीने ‘मार्क युवर सिटी सेफ’ ही मोहीम हाती घेतलीय.
‘अँन्ड्रॉईड’ फोन वर हे अॅप डाऊनलोड केल्यास ‘स्टॅम्प’ फिचरमध्ये सहभागी होऊन आपल्या अनुभवानुसार एखादं ठिकाण सुरक्षित अथवा असुरक्षित मार्क करता येईत. यामुळे इंटरनेट मॅपवरही लाल आणि हिरव्या रंगांच्या क्लस्टर्सने ती ठिकाणं सुरक्षित आहेत किंवा नाहीत हे समजून येईल.
मात्र, ही मोहीम केवळ या ‘अॅप’वरच थांबणार नसून या सगळ्यांना जोडणार एक कॉलसेंटर सुरु कण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेची दखल आप सरकारनेही घेतलीय. दिल्लीमध्येही महिलांच्या सुरक्षिततेसाठी या ‘अॅप’चा वापर लवकर सुरु करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.