www.24taas.com, झी मीडिया, बार्सिलोना
सॅमसंगचा बहुप्रतिक्षित असा `गॅलेक्सी एस-५` नुकताच बार्सिलोनामध्ये लॉन्च करण्यात आलाय. फिंगरप्रिंट स्कॅनरसहीत याफोनमध्ये हार्ट रेट सेन्सरचीही सुविधा देण्यात आलीय. त्यामुळे टेक्ननोसॅव्ही आणि आपल्या आरोग्याकडे चांगलंच लक्ष देणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन एक चांगलं ऑप्शन ठरू शकणार आहे.
सॅमसंगचा सर्वात आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे सॅमसंगचा गॅलेक्सी एस-५... अनेक दिवसांपासून हा फोन चर्चेत आहे. यूजर्समध्ये लॉन्चिंगआधीच या फोनची क्रेझ निर्माण झालेली दिसून येत होती. मार्च महिन्यापासून हा फोन भारतात उपलब्ध होईल.
सॅमसंग एस-५ ची वैशिष्ट्ये
* ऑपरेटींग सिस्टम : अँड्राईड ४.४.४ (किटकॅट
* डिस्प्ले : ५.१ एफएचडी सुपर अमोल्ड (१९२० X १०८०)
* नेटवर्क : एलटीई कॅट.४ (१५०/५० mbps)
* कॅमेरा : १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा
* फ्रंट कॅमेरा - २.० मेगापिक्सल
* व्हिडिओ - अल्ट्रा हाय डेफिनेशन, व्हिडिओ स्टेबिलायझर
* रॅम - दोन जीबी
* इंटरनल मेमरी - १६ आणि ३२ जीबी असे दोन पर्याय
* मायक्रो एसडी - ६४ जीबीपर्यंत मेमरी कार्डच्या वाढवता येऊ शकते
* ब्लू टूथ - ४.० BLE/ ANT+
* यूएसबी - यूएसबी ३.०
* सेन्सर : एक्सीलरोमीटर, भ्रमणदर्शक यंत्र, होकायंत्र, स्थितिमापक, हॉल, RGB वातावरणीय प्रकाश, हावभाव (IR), फिंगर स्कॅनर, हार्ट रेट सेन्सर
* बॅटरी : 2800mAh
* स्टँडबाय टाईम : ३९० तास / टॉक टाईम : २१ तास
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.