भारतात फेसबुकवर आता सेंसॉरशिप!

फेसबुकने अखेर भारतातून प्रसिद्ध होणारा आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरविणारा मजकूर काढून टाकण्यास होकार दिला आहे. तसंच यापुढे फेसबुकवर जे युजर्स असे आक्षेपार्ह मजकूर टाकतील, त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 22, 2012, 04:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
फेसबुकने अखेर भारतातून प्रसिद्ध होणारा आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरविणारा मजकूर काढून टाकण्यास होकार दिला आहे. तसंच यापुढे फेसबुकवर जे युजर्स असे आक्षेपार्ह मजकूर टाकतील, त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल.
फेसबुकवर मॉर्फ्ड फोटोज, व्हिडिओ, समाजात द्वेष पसरवणारे मजकूर यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. भारत सरकारने यापूर्वीच फेसबुकला नोटिस पाठवली होती. देशात शांतता नांदावी, यासाठी अशा प्रकारचे फोटो, मजकूर हटवावेत, अशी मागणी भारत सरकारने केली होती.
या नोटिसीला उत्तर देताना फेसबुकने आपण आक्षेपार्ह मजकूर काढूनटाकणार असल्याचं स्पष्ट केलं आङे. अमेरिका तसंच भारतीय फेसबुक कर्मचारी फेससबुकवर अपलोड होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरावर लक्ष ठेवतील. समाजात शांतता नांदावी यासाठी आम्ही हे पाऊल उचलत असल्याचं फेसबुककडून कळवण्यात आलंय.
ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाचं बनावट अकाऊंट बनवलं गेलं असून, त्यावरून नकली मजकूर प्रसारित झाल्याचं खुद्द ट्विटरनेही आता मान्य केलंय. याआधी सूचना देऊनही ट्विटर हे अकाऊंट बंद करण्यास तयार नव्हती. ट्विटरवर भारत सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे. ट्विटरवरील बनावट अकाऊंटमुळे पंतप्रधानांची प्रचिमा मलिन होत असल्याचे सांगितले गेले होते. मात्र तरीही ट्विटरने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता ट्विटरवरच भारत सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे.