www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
१-१-१, २-२-२, १२-१२-१२ आणि आता आज आलेली या शतकातली शेवटची अनेखी तारीख ११-१२-१३. सध्या सोशल मिडियावर ११-१२-१२ या तारखेने सर्वांनाच भुरळ घातलीये. तरुणाई तर या तारखेच्या शुभेच्छा देण्यात आणि आजच्या तारखेला आयुष्यभर स्मरणात ठेवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा बेत आखतीये. आता अशा तारखेचा योग तब्बल ९० वर्षांनंतर येणार आहे. त्यामुळे अनेक तरुण तरुणींनी लग्नासाठी याच तारखेची निवड केली आहे.
अनेकजण वाहन खरेदी, गृहप्रवेशासाठी या तारखेची वाट पहात होते तर अनेकांनी चक्क याच दिवशी आई-बाबा होण्याचा हट्टही पूर्ण करुन घेतलाय. ११-१२-१३- १४-१५ ही वेळ आपल्या बाळाचा जन्माची व्हावी, असा अट्टहास अनेक मातांनी धरल्याचे कळते. अशी आगळीवेगळी तारीख बाळाच्या जन्माची असावी अशी अनेक पालकांची इच्छा दिसून येत आहे. तर काही जण अशा तारखांना लग्न उरकून घेतात. तर काहीजण आपल्या आवडीच्या व्यक्तीला भेटवस्तू देतात.
ज्योतिषशास्त्रातील मुहूर्तात मात्र अशा तारखा महत्त्व नाही. या क्षेत्रातील अभ्यासक तसं स्पष्ट करतात. मित्रमंडळींच्या ग्रुपमध्येही हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो. चांगली आठवण लक्षात राहावी, यासाठी त्यातही ११-१२-१३ हा दिवस आणि १४-१५ही वेळ ठरवून एकत्र भेटायचे आणि हा दिवस संस्मरणीय करायचा असे खूप दिवसांपासूनच ठरल्याचे, व्हॉट्सअपवर तशा चर्चाही रंगल्या होत्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.