www.24taas.com, ठाणे
सात मजली इमारतीचं बांधकाम केवळ तीन महिन्यांत... होय, असंच बांधकाम करण्यात आलं होतं ठाण्यात काल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीचं...
ठाण्यात शिळफाट्याजवळ झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह आठ जणांविरोधात डायघर पोलीस ठाण्य़ात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दुर्घटनेत ३४ निष्पाप नागरिकांचे बळी घेणारे बिल्डर जमीर कुरेशी आणि सलीम शेख दुर्घटनेनंतर फरार झाले आहेत. या दोघांनी एक वर्षापूर्वी केवळ तीन महिन्यात ही सात मजली बिल्डिंग उभी केली होती. केवळ स्वत:च्या फायद्याचा विचार करून अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम करणारे हे दोघे आता फरार झाले आहेत.
लकी कम्पाऊंडमधली ही अनधिकृत इमारत इथे राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठली. अनधिकृत इमारतीत फ्लॅट विकत घेऊन नागरिकांनी एकप्रकारे मृत्यूच विकत घेतला होता. नागरिकांसाठी हे बिल्डर यमदूतच बनून आले होते, अशी प्रतिक्रिया आता ऐकायला मिळतेय.