ठाण्यात भाजप नेते पुन्हा आमने-सामने!

ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 8, 2014, 02:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.
मुकेश मोकाशी आणि संजय वाघुले या दोघांनीच मारहाण केल्याचा आरोप पाटणकरांनी केलाय. तसंच या वाघुले आणि मोकाशींच्या दबावामुळंच आपल्याला राजीनामा द्यावा लागल्याचा आरोपही पाटणकरांनी केलाय.
ठाणे महापालिका परिवहन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या पराभवाचं खापर पाटणकर यांच्यावर फोडण्यात आलं होतं. त्यानंतर पाटणकरांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली होती.
तसंच त्यांची पक्षाकडे तक्रार करण्यात आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पाटणकर काही दिवस अज्ञातवासात होते. या सर्व वादावर बोलण्यासाठी पहिल्यांदाच ते मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.