www.24taas.com, झी मीडिया, रायगड
हिवाळ्यात उरणच्या समुद्रकिना-याकडे आकर्षीत होणा-या फ्लेमींगो पक्षांची शिकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उरण मध्ये उघडकीस आलाय.
गेल्या काही दिवसांपासून उरणजवळील पाणजे खाडी परिसर, डोंगरी पाणजे आणि फुंडे गाव ते शेवा पोलीस ठाण्याच्या परिसरात फ्लेमींगोची शिकार झाल्याचं उघडकीस आलंय. या भागांत मृत फ्लेमींगोंचे अवशेष आढळून आलेत.
फ्लेमींगोच्या शिकारीतून या शिका-यांना प्रतिपक्षी शंभर रुपये मिळतात.. या पक्ष्याच्या पीसे, चोच आणि इतर अवशेशांना बाजारात मोठी मागणी असल्यामुळे त्यांची या भागात मोठ्याप्रमाणात चोरटी शिकार होत असल्याचं उघडकीस आलंय.
अत्यंत संवेदनशील प्रकारात मोडले जाणा-या या फ्लेमींगोंच्या शिकारीवर वेळीच पावलं न उचलल्यास हे दुर्मीळ पक्षी या भागाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.