www.24taas.com, झी मीडिया, मुंब्रा
मुंब्रा इमारत दुर्घटना प्रकरणी दोन बिल्डरांना अटक करण्यात आलीय. अकिल आणि शकील शेख अशी त्यांची नावं असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. यापैकी शकील शेख याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक असल्याचं उघड झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड,पालकमंत्री गणेश नाईक, नजीबमुल्ला आणि राष्ट्रवादीशी जवळीक असणारे आनंद परांजपे यांच्यासोबत या शकील शेखचे फोटो आहेत.
प्रत्येक वेळी ठाण्यात इमारत दुर्घटना झाल्यानंतर ही मंडळी हात झटकतात. बिल्डरांशी कोणतेही संबंध नसल्याच्या बाता करत जबाबदारी घेण्यासही कुणीच तयार होत नाही. मात्र हेच नेते आणि बिल्डर यांची कशी छुपी युती असते याची ही बोलकी दृष्यं पाहायला मिलाली आहेत. असाच काहीसा प्रकार शिळफाटा दुर्घटनेनंतरही समोर आला. या दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादीच्या हिरा पाटील या नगरसेवकाला अटक झालीय.. अजूनही तो जेलमध्ये आहे.. त्यामुळं राष्ट्रवादीचं या बिल्डरांना अभय आहे का असा सवाल उपस्थित होतोय.
ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात इमारत कोसळून तिघांचा बळी गेलाय. ही इमारत बारा वर्षापूर्वी बांधण्यात आली होती मी त्यावेळेस राजकारणातही नव्हतो असे सांगत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आपले हात झटकले. या बांधकाम व्य़ावसायिकांशी त्यांचे संबंध आहेत असे विचारले असता त्यांनी मी आमदार आता झालोय असे सांगत आपली हतबलता व्यक्त केली. नाशिकमध्ये झालेल्या विभागीय युवती परिषदेच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.