www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीसाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे विजयी झालेत. दरम्यान, मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आला होता. फोडाफोडी करूनही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादी तटस्थ राहिल्याने सेनेला फायदा झाला.
काँग्रेसकडून जीतू भोईर आणि मनसेकडून राजन मराठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत चुरस रंगली होती. सर्वच पक्षांनी रणनिती आखली होती. मनसेच्या उमेदवारीमुळे शिवसेनेसाठी ही निवडणुक मोठी आव्हान बनली होती. भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावडे या दोन दिवसांपासून संपर्कात नसल्याने युतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्या मनसेच्या हाती लागल्या होत्या. त्यांना पालिकेत आणताना मनसेनेने संरक्षण दिले होती. यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार दिसून आला.
कॉंग्रेसचे नगरसेवक आयुब कुरेशी हे परदेशवारीवर असल्याने काँग्रेसमध्ये देखील अस्थिरता होती. मात्र आयुब कुरेशी हे संपर्कात असून ते आज मतदान करण्यासाठी येतील असा दावा काँग्रेसचे गट नेते सचिन पोटे यांनी केला. स्थायी समितीमध्ये शिवसेना - 6, भाजप - 1, राष्ट्रवादी -2, कांग्रेस -2, मनसे -4, आणि अपक्ष - 1 असे पक्षीय बलाबल आहे. तीन उमेदवार रिंगणात राहिल्यास शिवसेनेचा विजय सहज मानला जात होता. परंतु भाजप नगरसेविका मनसेनेने फोडल्याने गणित बिघडले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे युती झाल्यास शिवसेनेचा पराभव होण्याची शक्यता होती. दरम्यान, राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका केल्याने सेनेचा विजय झाला.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेत गदारोळ झालाय. शिवसेना नगरसेविकांनी भाजप नगरसेविका अर्चना कोठावडे यांना धक्काबुक्की केली गेली. निवडणुकीपूर्वी भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावडे संपर्कात नसल्याची तक्रार रवींद्र चव्हाण यांनी दाखल केली होती. त्यामुळे सेनेची अस्वस्था होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.