कोकण विभागात म्हाडाची घरे

म्हाडाच्या कोकण विभागातील रहिवाशांसाठी खुशखबर आहे. म्हाडाचे कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ येत्या तीन-चार वर्षात तब्बल साडे सात हजारापेक्षा जास्त घरे बांधणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2012, 10:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
म्हाडाच्या कोकण विभागातील रहिवाशांसाठी खुशखबर आहे. म्हाडाचे कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ येत्या तीन-चार वर्षात तब्बल साडे सात हजारापेक्षा जास्त घरे बांधणार आहे.
या घरांपैकी 5,000 घरे ही एकट्या विरारमध्ये असणार आहेत. तर ठाणे शहरांत 2200 पेक्षा जास्त घरे म्हाडाचा कोकण विभाग बांधणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला इथेही 150 घरे बांधली जाणार असल्याचं कोकण विभागाच्या अधिका-यांनी सांगितलंय.
येत्या तीन-तार वर्षात टप्प्याटप्प्याने ही घरे लॉटरी पद्धतीने दिली जातील. अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी प्रामुख्याने ही घरे असतील.
उच्च उत्पन्न गटासाठी फार थोडी घरे दिली जाणार आहेत. विरार आणि ठाणे इथे मोठ्या प्रमाणात बांधल्या जाणा-या घरांमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात घरे मिळण्याची संधी उपलब्ध झालीये.